नाशिक : जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. ढिकले यांच्या देवळा येथील पतसंस्थांना भेटी

देवळा,www.pudhari.news

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनने जिल्ह्यातील विविध पतसंस्थांना भेट देत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘जिल्हा फेडरेशन आपल्या दारी” हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. २७) रोजी देवळा शहरातील विविध पतसंस्थांना जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, कार्याध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष भारत कोठावदे व संचालक मंडळाने भेट दिली.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकलेल्या पतसंस्थांच्या ठेवी, जिल्हा बँकेची पतसंस्थांच्या ठेवीवर बेकायदेशीर टीडीएस कपात, पतसंस्थांचे अंशदान, थकबाकी वसुली यासह दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या अडचणी याबाबत भेटीत उहापोह करण्यात आला. याप्रसंगी देवळा येथील श्री. रामरावजी आहेर पतसंस्था, किशोर सूर्यवंशी पतसंस्था, आशापुरी महिला पतसंस्था, अमृतकार पतसंस्था व देवळा मर्चंट बँकेस जिल्हा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, कार्याध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष भारत कोठावदे, संचालक के.के अण्णा चव्हाण, अविनाश कोठावदे, राकेश चव्हाण, दीपक महाजन, बापूसाहेब गायकवाड, जीएम गायकवाड, अशोक शिरोडे, शिवाजीराव पगार, सुनील केदार, तानाजी घुगे, फेडरेशनचे सीईओ सोपान थोरात, योगेश आहेर, वसुली अधिकारी सतीश पुणेकर आदींसह देमकोचे व्हा. चेअरमन डॉ. प्रशांत निकम, जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे, संचालक हेमंत अहिरराव, किशोर सूर्यवंशी पतसंस्थेचे चेअरमन व नियोजित देवळा तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कौतिक पवार, रामराव आहेर पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद शिंदे, व्हा. चेअरमन दीप्ती आहेर यांच्यासह पतसंस्था चळवळीतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. ढिकले यांच्या देवळा येथील पतसंस्थांना भेटी appeared first on पुढारी.