
देवळा; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनची थांबविण्यात आलेली निवडणूक येत्या २५ डिसेंबररोजी घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी दि. २६ रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश महंत यांनी दिली.
या संस्थेची सन २०२२-२०२७ या कालावधीची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार थांबविण्यात आली होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचा आदेश १४ डिसेंबर २०२२ अन्वेय सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविल्या आहेत. तेथून पुढे दि. २१ डिसेंबर २०२२ पासून घेण्याचे निर्देश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.
नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनची थांबविलेली निवडणूक होणार असल्याने पुन्हा एकदा राजकीय घडामोडीना वेग येणार आहे. देवळा तालुका संचालक पदासाठी बिनविरोध निवडीचा मार्ग धूसर बनल्याने तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. सुनील देवरे (वाजगाव), सुभाष गायकवाड (उमराणे), सतीश देशमुख (लोहोणेर) यांचा समावेश आहे. एकूण ४६ मजूर सभासद असून ते कोणत्या उमेदवाराला पसंती देतात, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. मात्र, उमे,दवार पुन्हा एकदा सभासदांच्या गाठीभेटी घेण्यासाठी कामाला लागले आहेत. ग्रामपंचायती पाठोपाठ मजूर संघाच्या निवडणुकीमुळे पुन्हा तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
हेही वाचलंत का ?
- Morocco FIFA WC : पराभवानंतर मोरोक्को खेळाडुंच्या ‘त्या’ कृतीने सर्वच झाले भावूक!
- Rakul Preet Singh: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रकुल प्रीतला ED कडून समन्स
- INDvsBAN 1st Test : भारत विजयाच्या उंबरठ्यावर, बांगलादेश समोर 513 धावांचे लक्ष्य
The post नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनसाठी २५ डिसेंबरला मतदान appeared first on पुढारी.