नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच महिलेची प्रसूती

रिक्षातच प्रसूती!

नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच गर्भवतीची प्रसूती झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि. १७) सायंकाळी घडला. सुदैवाने आई व नवजात बालिका दोघीही सुखरूप असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

वनिता मनीष वाकडे (रा. जेलरोड) या गर्भवतीस गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास रिक्षाने जिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र जेलरोड ते जिल्हा रुग्णालय प्रवासादरम्यान गर्भवतीस वाहतूक कोंडीचा व रस्त्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागला. सायंकाळी ६ च्या दरम्यान रिक्षा जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आली. मात्र प्रसूती वेदना असह्य झाल्याने वनिता यांनी रिक्षातच मुलीला जन्म दिला. रिक्षाचालकाने मदतीसाठी हाका मारल्याने रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी धाव घेत उपचार केले. नवजात बाळ व आईला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच महिलेची प्रसूती appeared first on पुढारी.