
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा शासकीय रुग्णालयात वॉर्डबॉयने एका मनोरुग्णास मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुग्णाच्या आईने सरकारवाडा पोलिसांकडे वॉर्डबाॅयविरोधात मारहाणीची फिर्याद दिली आहे.
३३ वर्षीय रुग्णाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (दि. १८) दुपारी जिल्हा रुग्णालयात तिच्या मुलावर उपचार सुरू होते. मुलावर उपचारासाठी इंजेक्शन देण्यासाठी संशयित वाॅर्डबाॅय विजय पवार तेथे आला. इंजेक्शन देत असताना रुग्ण हलल्याने विजय पवार संतप्त झाला व त्याने रुग्णास शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- नाशिकमध्ये शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती; ढिकले, तांबडे यांची निवड
- ग्रा. पं. कर्मचार्यांना मिळेना वेतनवाढ, टोलवाटोलवीबद्दल नाराजी
- Google Mistake : गुगलने चुकून एका हॅकरला पाठवले 2 कोटी रुपये, ट्विट व्हायरल…वाचा काय म्हणाले गुगल
The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉयकडून मनोरुग्णास मारहाण appeared first on पुढारी.