
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात शासकीय अधिकाऱ्यांनी गर्भलिंग प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार मनसेचे पदाधिकारी प्रणव सदानंद मानकर यांनी सरकारवाडा पोलिसांकडे केली आहे.
मानकर यांच्या तक्रारीनुसार, जिल्हा रुग्णालयात २३ फेब्रुवारीला विनापरवानगी सोनोग्राफी मशिनचा डेमो घेण्यात आला. मात्र हा प्रकार उघडकीस येताच मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी मागील तारखेचे परवानगी पत्र दिले. तसेच १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात हे दिल्ली येथे असताना २० तारखेच्या स्वाक्षरीचे त्याचे पत्र असल्याने शंका उपस्थित हाेत आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला. सोनोग्राफी मशिन २२ ते २४ फ्रेबुवारी दरम्यान अनधिकृतरित्या इतरत्र फिरत होते. त्यामुळे गर्भलिंग प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप मानकर यांनी केला आहे.
यासंदर्भात डॉ. थोरात यांनी दावा केला आहे की, २२ फेब्रुवारीला व्हेंटीलेटरचा डेमो झाला तर सोनोग्राफी मशिनचा डेमो २३ फेब्रुवारीला परवानगी घेऊन करण्यात आला. तसेच डेमोवेळी कोणताही रुग्ण नव्हता.
हेही वाचा :
- पशु-पक्षी प्रदर्शनासाठी 3.74 कोटी ! शिर्डीत मार्चमध्ये भरणार राज्यस्तरीय प्रदर्शन
- नाशिक : जॉगिंग ट्रॅक बनले टवाळखोरांचे अड्डे
- नाशिक : जॉगिंग ट्रॅक बनले टवाळखोरांचे अड्डे
The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात गर्भलिंग प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार appeared first on पुढारी.