नाशिक : जिल्ह्यातील नऊ कृषी निविष्ठा केंद्रांचा परवाना निलंबित

कृषी विभाग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील चांदवड, देवळा आणि कळवण तालुक्यांतील नऊ कृषी निविष्ठा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई करीत या केंद्रांचा परवाना एक महिना निलंबित केला आहे. या कारवाईमध्ये लोहोणेर, कळवण, दुगाव येथील केंद्रांचा समावेश आहे.

खते उपलब्ध असताना खते न देणे तसेच जादा दराने खतांची विक्री करणे, अशा तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात अभिजित जमधडे यांच्यासह जिल्हा भरारी पथकाने तालुका भरारी पथकासमवेत चांदवड, देवळा व कळवण तालुक्यांतील खतविक्री केंद्रांची तपासणी केली होती. यावेळी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजित घुमरे, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, मीनल म्हस्के, कृषी अधिकारी राहुल आहेर, किरण शिंदे, नलिनी खैरनार उपस्थित होते. खतविक्रेत्यांनी केंद्राच्या दर्शनी भागात खतसाठा आणि किमतीची माहिती लावावी. खताचे लिंकिंग होणार नाही आणि जादा दराने विक्री होणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतकर्‍यांना खतांचे पक्के बिल द्यावे. अनुदानित खतांची विक्री ई-पॉस यंत्राद्वारे करावी. हलगर्जी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा अधिकारी कृषी अधीक्षक सोनवणे यांनी दिला आहे.

शेतकरी वेशात अधिकारी
कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकरी वेशात सत्यतेची पडताळणी केली. त्यानंतर नऊ खतविक्रेत्यांची सुनावणी जिल्हा अधिकारी कृषी अधीक्षक सोनवणे यांच्याकडे झाली. उपलब्ध पुरावे आणि लेखी म्हणण्याच्या आधारे परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यातील नऊ कृषी निविष्ठा केंद्रांचा परवाना निलंबित appeared first on पुढारी.