नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरील देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या औषधी वनस्पतींच्या दृष्टीने डोंगर चर्चेत आला आहे. येथील डोंगरावर जास्तीत जास्त औषधी वनस्पती असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्रातील वनस्पती संशोधक व पर्यावरण प्रेमी यांनी काढला आहे. आयुर्वैदातही या वनस्पतींना महत्व आहे.

सप्तशृंगीचा डोंगर या गावाचा जणू पाठीराखाच आहे. पावसाळ्यात सप्तशृंगीचा डोंगर गडद हिरवा गार होतो. येथील पावसाळ्यात वाहणारे औषधी पाणी भौरी या ठीकाणी बांधलेल्या तलावात वाहत येत असते. मात्र, या डोंगरावरील औषधी वनस्पती आता कमी होत चालल्याने त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. हा पुरातन डोंगर जैव विविधतेने नटलेला आहे.

सप्तशृंगीचा डोंगर म्हणजे वनऔषधींचा खजिनाच आहे. अनेक दुर्मिळ आजारांवर रामबाण उपाय ठरतील अशा औषधी वनस्पती येथे आढळून येतात. यामध्ये रान कांदा, सफेद मुसळी, बांबू गुळवेल, दगडी फुल, हरण खुरी, नागरमोथा, शेंदरी करटोली, कर्दळ रान हळाद, खैर, चित्रक, जांभूळ करवंद, काळा कुडा, निर्गुडी तर्वड, वड, पिंपळ, उंबर लाजाळू या औषधी वनस्पतींचा प्रामुख्याने समावेश आहे.

चित्रज वनस्पती
करटुले वनस्पती

येथे पावसाळ्यात आढळणाऱ्या रानभाज्या देखील अनेक आजारांवर रामबाण उपाय असतो. सप्तशृंगी गडाच्या चहुबाजूने वन विभागाचे जंगल आहे. विविध औषधी वनस्पती येथे आढळत असल्याने त्या शोधून त्यावर प्रक्रीया करणे, त्यांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे बनले आहे.

सप्तशृंगगड हे दऱ्याखोऱ्यात डोंगरद-यात वसलेलं पर्यटन तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी गावाच्या चोहोबाजूने जंगल असल्याने विविध औषधी वनस्पती आढळून येतात. मात्र, येथील औषधी वनस्पतींचे संवर्धन व जतन होणे काळाची गरज आहे. याबाबत वनविभागानेच काय ती उपाययोजना करावी.

– संदिप बेनके, ग्रा.स सदस्य सप्तशृंगगड

सप्तशृंगगडावरील जंगलात विविध औषधी वनस्पती आढळून येतात. या वनस्पतींचे संवर्धन व जतन करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे.
-डी. डी बागुल, वनपाल आभोणा

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यातील 'या' गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना appeared first on पुढारी.