नाशिक जिल्ह्यातील सर्वांत सुंदर गावांची घोषणा, ‘या’ दोन गावांची निवड

कोकण खेडे गाव

नाशिक/ दरेगाव : पुढारी वृत्तसेवा- स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर या गुणांकावर देण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेत नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील कोकणखेडे व निफाड तालुक्यातील तामसवाडी या गावांची निवड झाली आहे. याबाबतची घोषणा जिल्हा परिषदेकडून करण्यात आली असून, 40 लाख रो‌ख रकमेचा पुरस्कार या दोन्ही गावांना विभागून देण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागांअंतर्गत 2016 पासून राज्यातील खेडेगावांत स्वच्छता, पर्यावरण तसेच पारदर्शक कारभाराच्या दृष्टीने स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण विकासात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचे योगदान लक्षात घेत राज्य सरकारने 20 मार्च 2020 पासून या योजनेचे आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव असे नामकरण केले आहे. या योजना जिल्हा परिषदेच्या राबविण्यात येत असून, यात तालुका आणि जिल्हास्तरावर गावांची निवड केली जाते. योजनेसाठी संनियत्रणासाठी जिल्हा परिदेच्या माध्यमातून समिती स्थ‌ानक करण्यात आलेली आहे. या समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार 2023 -24 करिता जिल्हा परिषदेकडून तालुका आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर केले आहेत. यात चांदवड तालुक्यातील कोकणखेडे आणि तामसवाडी हे गाव सर्वांत सुंदर म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर पंधरा तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाची निवड तालुकास्तरावर करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जाहीर केले आहे. तालुकास्तरीय पुरस्कारासाठी दहा लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात जाणार आहे.

पुरस्कार प्राप्त रकमेतून होणार ही कामे

-अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प, स्वच्छतेसंबंधित प्रकल्प, महिला सक्षमीकरण आणि मुलांसाठी अनुकूल प्रकल्प, स्वच्छ पाणी वितरण प्रकल्प, भौगोलिक माहिती प्रणाली बसववणे, ग्रामपंचायत हद्दीद सौरऊर्जा पथदीप बसविणे, सार्वजनिक जमिनीवर अतिकम्रण होऊ नये म्हणून कुंपण घालणे, नागरिकांच्या सोयीसाठी वाय- फाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे आदी.

तालुका आणि जिल्हास्तरावर मिळालेला पुरस्कार सर्व सदस्य, ग्रामस्थ‌ आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याचे फळ आहे. सर्वांच्या एकोप्यामुळेच योजनत सहभाग नोंदवणे आणि निवडीसाठी आवश्यक काम करता आले. – सरपंच संदीप शिंदे, कोकणखेडे, ता. चांदवड

तालुकानिहाय सुंदर गाव

चांदवड -कोकणखेडे

सिन्नर- बारागाव प्रिंपी

निफाड- तासमवाडी

नाशिक- लहवित

बागलाण -अंबासन

दिंडोरी- जऊळके वणी

त्र्यंबकेश्वर- पिंप्री (त्र्यं)

इगतपुरी- कुशेगाव

येवला- कोटमगावस (बु)

नांदगाव -जामदरी

मालेगाव- डाबली

पेठ- हरणगाव

देवळा- मेशी

कळवण- तिऱ्हळ

हेही वाचा –

The post नाशिक जिल्ह्यातील सर्वांत सुंदर गावांची घोषणा, 'या' दोन गावांची निवड appeared first on पुढारी.