Site icon

नाशिक : जिल्ह्यातील ३,६६२ विद्यार्थ्यांना मिळाले जातवैधता प्रमाणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १ ते ३० एप्रिल या कालावधीत ‘सामाजिक न्याय पर्व’ उपक्रम राबविण्यात आला होता. त्याअंतर्गत जिल्हातील ३ हजार ६६२ विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. तर ५ हजार ६९७ विद्यार्थ्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून जात प्रमाणपत्र देण्यात आले. इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहिमेचे फलदायी ठरली.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे. तसेच त्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन भरलेले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी पडताळणीचे ऑनलाइन अर्ज भरून ‘नागरी सुविधा केंद्र’ येथे जमा करावे लागणार आहे. त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून हे अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत.

दरम्यान, अर्जदारानी अर्ज भरताना स्वतःचा ईमेल व मोबाइल क्रमांकाद्वारेच अर्ज नोंदणी करावा, सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करण्यात यावीत व आपला युझर आयडी व पासवर्ड व्यवस्थित जतन करून ठेवण्यात यावा, त्रयस्थ व्यक्तींच्या आमिषास बळी पडू नये, कार्यालयाबाहेरील व्यक्तीशी संपर्क न साधण्याचे आवाहन समितीने केले.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील ३,६६२ विद्यार्थ्यांना मिळाले जातवैधता प्रमाणपत्र appeared first on पुढारी.

Exit mobile version