नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच १५ ग्रामपंचायतींमधील सरपंच व सदस्यांच्या १८ रिक्त जागांसाठीच्या प्रचाराचा धुरळा शुक्रवारी (दि.३) सायंकाळी बसला. या सर्व ठिकाणी रविवारी (दि.५) मतदान होत असून, मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे साहित्यासह शनिवारी (दि.४) मतदान केंद्रांकडे रवाना होतील. (Nashik Gram Panchayat Election)
जिल्ह्यामध्ये ४८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. अर्ज माघारीनंतर प्रत्यक्षरीत्या ४३ ग्रामपंचायतींमधील सदस्यपदांच्या २०० जागांसाठी तसेच ४४ ठिकाणी थेट सरपंचपदासाठी लढत आहे. या व्यतिरिक्त १६ ग्रामपंचायतींमधील सदस्यांसाठीच्या १५ तसेच सरपंचाच्या तीन अशा एकूण १८ जागांकरिता पोटनिवडणुका होत आहेत. या सर्व ठिकाणी रविवारी (दि.५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान पार पडणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. (Nashik Gram Panchayat Election)
सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये एकूण ४३ तर पोटनिवडणुकांसाठी सुमारे २५ च्या आसपास मतदान केंद्र अंतिम करण्यात आले आहेत. तसेच मतदानासाठीचे ईव्हीएम व अन्य साहित्य घेऊन अधिकारी व कर्मचारी हे शनिवारी (दि.४) दुपारी मतदान केंद्राकडे रवाना होतील. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. मतदार कोणाला कौल देणार हे सोमवारी (दि.६) स्पष्ट होईल. (Nashik Gram Panchayat Election)
१८४ सदस्य बिनविरोध
जिल्ह्यात ४८ ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या ४१६ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. पण, माघारीनंतर १८४ सदस्य हे बिनविरोध निवडून आले असून, ३२ ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. तसेच तीन ठिकाणी सरपंच बिनविरोध ठरले असून, ४४ ग्रामपंचायतींत सरपंचाच्या जागांसाठी मतदान होईल.
१२८ ठिकाणी अर्ज नाही
पोटनिवडणुकांमध्ये १४५ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांच्या रिक्त जागांकरिता १२८ ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. तर ४९ सदस्य बिनविरोध आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात १६ जागांसाठी मतदान होणार आहे. सरपंचांच्या चार जागांमधून एक बिनविरोध आला असून, तीन ठिकाणी निवडणूक होत आहेत.
अशी आहे स्थिती
– एकूण १८० ईव्हीएमवर होणार मतदान
– प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती
– केंद्राध्यक्षासह तीन केंद्राधिकारी, प्रत्येकी शिपाई व पोलिस कर्मचारी सहभाग
हेही वाचा :
- Naresh Karda Case Nashik : नरेश कारडा यांच्या कोठडीत रविवारपर्यंत वाढ; काय आहे प्रकरण ?
- माणसाप्रमाणे उंदीरही करतात कल्पना!
- Pune News : पालिकेच्या रुग्णालयांत अनारोग्य सेवा! सामान्य नागरिकांची हेळसांड
The post नाशिक जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान appeared first on पुढारी.