Site icon

नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येत्या १२ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता आठवी) नाशिक जिल्ह्यातून यंदा ४९ हजार १४६ विद्यार्थी बसणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी नाताळ सुटीचा फायदा घेत अभ्यासात झोकून दिले आहे.

शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. निकालानंतर गुणवत्ता यादीत पात्र ठरणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरमहा १०० रुपये, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे म्हणजेच दहावीपर्यंत दरमहा १५० रुपये शिष्यवृत्ती मिळते.

शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन आवेदनपत्र शाळांनी भरण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली असून, जिल्‍ह्यात तब्‍बल ४९ हजार १४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेला आहे. गेल्‍या वर्षी इयत्ता पाचवीसाठी २० हजार ९२१ विद्यार्थ्यांनी, तर इयत्ता आठवीच्‍या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १७ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यंदा इयत्ता पाचवीसाठी २७ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी, तर इयत्ता आठवीसाठी २१ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील ४९,१४६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार appeared first on पुढारी.

Exit mobile version