नाशिक : जिल्ह्यातील 42 सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

निवडणूक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सहकारी सोसायट्या, बँका, साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांचा मार्ग खुला झाला आहे. त्यानुसार उपनिबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील 42 संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याला सहकार प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, काही संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉनटीचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी अर्थात एनडीएसटी पतसंस्था, मविप्र सेवक सोसायटी, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था, ग्रामसेवक पतसंस्था यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांची जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करून अर्जाची छाचनी होऊन अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक स्थगित झाली होती. ही स्थगिती उठली असून, 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 27 ऑक्टोबर 2022 पर्यंत माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. 28 ऑक्टोबरला चिन्हांचे वाटप होईल. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन लागलीच मतमोजणी होईल. दरम्यान, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या 15 जागांसाठी सर्व संवर्गांतून विक्रमी 106 अर्ज आलेले आहेत. कर्मचार्यांच्या हक्काची पतसंस्था असून, आतापर्यंत ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून, यंदाची निवडणूकही बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे.

संस्थानिहाय निवडणूक तारखा

संस्था व तारीख

एनडीएसटी 15 ऑक्टोबर
बिझनेस बँक 31 ऑक्टोबर
वणी मर्चंट बँक 31 ऑक्टोबर
मालेगाव मर्चंट 5 नोव्हेंबर
सरस्वती बँक ओझर 6 नोव्हेंबर
पिंपळगाव मर्चंट 8 नोव्हेंबर
लोकनेते दत्ताजी पाटील 8 नोव्हेंबर
ओझर मर्चंट 13 नोव्हेंबर
ग्रामसेवक पतसंस्था 12 नोव्हेंबर
समर्थ बँक 13 नोव्हेंबर
जनलक्ष्मी बँक 13 नोव्हेंबर
येवला मर्चंट13 नोव्हेंबर
मविप्र13 नोव्हेंबर
निफाड अर्बन 16 नोव्हेंबर
फैज बँक 18 नोव्हेंबर
आणि इतर अशा 26 संस्थांची छाननी आणि माघारी प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील 42 सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.