नाशिक : जिल्ह्यात आजपासून चार दिवस मुसळधार

नाशिक पाऊस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात शुक्रवारी (दि.22) पावसाने उघडीप दिल्याने धरणांच्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. गंगापूरचा विसर्ग 1,836 तर दारणाचा विसर्ग 1,100 क्यूसेकपर्यत घटविण्यात आला. दरम्यान, शनिवारपासून (दि.23) पुढील चार दिवस जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकल्याने नद्या-नाले दुथडी वाहत आहेत. मात्र, मागील तीन दिवसांपासून त्याचा जोर ओसरल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याचा वेग मंदावल्याने विसर्गात कपात करण्यात आली.

गंगापूरमधील आवक घटल्याने धरणांचा विसर्ग सायंकाळी 3 हजार क्यूसेकवरून 1, 836 क्यूसेकपर्यंत घट करण्यात आली. तर इगतपुरीतही पाऊस कमी झाल्याने दारणाचा विसर्ग 1,100 क्यूसेकपर्यंत घटविण्यात आला. शनिवारपासून (दि.23) दक्षिणेकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये मंगळवारपर्यंत (दि.26) मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात आजपासून चार दिवस मुसळधार appeared first on पुढारी.