
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात बुधवारी (दि.17) एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात नव्याने 19 कोरोनाबाधित आढळून आले असून, 76 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय बाधितांची संख्या घटून 344 वर आली आहे. बुधवारी शहरात 16, ग्रामीण भागात तीन बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार 903 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी शहरात चार हजार 108, ग्रामीण भागात चार हजार 305, मालेगावमध्ये 364 व परजिल्ह्यातील सहा बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात उपचार घेणार्या बाधितांपैकी चार जणांमध्ये लक्षणे आढळून आली असून, चौघांनाही ऑक्सिजनची आवश्यकता भासली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत 935 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे.
हेही वाचा :
- जम्मूमध्ये ‘एनआयए’चे छापे
- सांगली : सरसकट पाणीपट्टीचा रोष आज महासभेत उमटणार
- नाशिक : मनपाला पाचच महिन्यांत 97 कोटी रुपयांचा तोटा
The post नाशिक : जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, नव्याने "इतके" बाधित appeared first on पुढारी.