Site icon

नाशिक : जिल्ह्यात गोवरचे ‘इतके’ रुग्ण, आरोग्य अधिकाऱ्यांनी केले महत्वाचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोवरसदृश रुग्णांची संख्या २ ने वाढली असून, आता दहा झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता त्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी केले आहे.

मुंबई येथे पाठविण्यात आलेल्या रक्तनमुन्यांचा अहवाल शुक्रवार (दि.२५)पर्यंत जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेस मिळणे अपेक्षित आहे. स्थलांतर आणि इतर कारणांमुळे अद्यापही लसीकरणाचे लाभार्थी होऊ न शकलेल्या बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी यंत्रणेस सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहते यांनी दिली आहे.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये गोवरचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गोवरचा संसर्ग प्रामुख्याने लहानग्यांमध्ये आढळत असल्याचे शून्य ते पाच या वयोगटातील बालकांच्या लसीकरणावर आता आरोग्य विभागाच्या वतीने भर दिला जातो आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ८५ टक्के लसीकरण झाले आहे.

दरम्यान, मालेगावमध्ये आतापर्यंत पाठविलेल्या १५६ रक्तनमुन्यांपैकी ५६ जणांचे रक्तनमुने हे गोवरच्या दृष्टीने पॉझिटिव्ह आहेत. तसेच जिल्ह्यातून आतापर्यंत एकूण २९९ नमुने पाठविण्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत जिल्ह्यातून एकूण १० नमुने मुंबईस तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

ही आहेत लक्षणे
डोळ्यांची लाली वाढणे, सर्दी, बारीक ताप, खोकला, पुरळ आणि मुखाचा अंतर्भाग

The post नाशिक : जिल्ह्यात गोवरचे 'इतके' रुग्ण, आरोग्य अधिकाऱ्यांनी केले महत्वाचे आवाहन appeared first on पुढारी.

Exit mobile version