नाशिक : जिल्ह्यात गुरूवारी (ता.10) दिवसभरात नव्याने 283 कोरोना बाधित आढळून आले. तर सहा रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून हे सर्व रूग्ण नाशिक शहरातील आहेत. 207 रूग्णांनी कोरोनावर मात केली. यातून ॲक्टिव्ह रूग्णसंख्येत सत्तरने वाढ झाली असून, सद्य स्थितीत 3 हजार 502 रूग्ण उपचार घेत आहेत.
बाधितांमध्ये नाशिक शहरातील 142
गुरूवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील 142, नाशिक ग्रामीणमधील 131, मालेगावचे सहा तर जिल्हाबाहेरील चार रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. बरे झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील 102, नाशिक ग्रामीणमधील 101 तर जिल्हाबाहेरील 4 रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जिल्ह्यात झालेल्या सहा मृत्यूंमध्ये सर्व सहा रूग्ण हे नाशिक शहरातील आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये अनेक दिवसांनंतर एकही मृत्यू झालेला नाही. तर मालेगावमध्येही कोरोनाने दिवसभरात कुठलाही रूग्ण दगावला नसल्याचे अहवालात नमुद केले आहे. शहरातील सहा मृतांमध्ये काठे गल्लीतील 64 वर्षीय महिला, फुलेनगर येथील 70 वर्षीय पुरूष, पाथर्डी फाटा येथील 67 वर्षीय पुरूष, इंदिरानगर येथील 72 वर्षीय पुरूष, पंचवटीतील 62 वर्षीय महिला, आणि म्हसरूळ येथील 76 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही
एकूण बाधितांची संख्या 1 लाख 4 हजार 534
दरम्यान जिल्हाभरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 4 हजार 534 झाली आहे. यापैकी 99 हजार 186 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 846 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात दाखल रूग्णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रूग्णालये व गृहविलगीकरणात 782, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात 80, मालेगाव महापालिका हद्दीतील रूग्णालये व गृहविलगीकरणात 7, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सहा, जिल्हा रूग्णालयात सात रूग्ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत 1 हजार 263 रूग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यामध्ये नाशिक शहरातील 615, नाशिक ग्रामीणमधील 419, मालेगाव महापालिका हद्दीतील 219 रूग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळल