
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा धोका आहे. मंगळवारी व बुधवारी (दि. 14 व 15) जिल्ह्यात नव्याने 12 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपर्यंत 32 सक्रिय बाधितांवर उपचार सुरू होते. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्गही वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी जिल्ह्यात आठ, तर बुधवारी चार बाधित आढळून आले आहेत. त्यात शहरातील सात, ग्रामीण भागातील तीन व परजिल्ह्यातील दोन बाधितांचा समावेश आहे. 32 पैकी एकाच बाधितामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत.
हेही वाचा:
- नाशिक : डाकसेवकांचा आजपासून दोनदिवसीय संप
- नाशिकच्या महापालिकेला मार्चअखेरपर्यंत 150 कोटींचा खर्च
- सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार? अश्वासन नको तारीख सांगा : अजित पवार
The post नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत आढळले 12 कोरोनाबाधित appeared first on पुढारी.