नाशिक जिल्ह्यात नव्याने 49 कोरोनाबाधित

कोरोना रुग्ण

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. 3) नव्याने 49 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 43 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, जिल्ह्यात रविवारी सायंकाळीपर्यंत 378 सक्रिय बाधितांवर उपचार सुरू होते. नाशिक शहरात नव्याने 26, ग्रामीण भागात 19, मालेगाव व परजिल्ह्यात प्रत्येकी 2-2 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील 15 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे. उपचार घेणार्‍या 49 बाधितांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

हेही वाचा ;

The post नाशिक जिल्ह्यात नव्याने 49 कोरोनाबाधित appeared first on पुढारी.