नाशिक जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिक : नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव. बागलाण तालुक्यातील वाठोडा गावात मयत झालेल्या कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण दिसून आली .१ किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

वाठोडा (तालुका सटाणा ) गावातील घरगुती पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण दिसून आले आहे, त्यामुळे एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे..त्या परिसरात कोणतेही व्यावसायिक पोल्ट्रीफार्म नाहीत. त्यामुळे अद्याप घाबरून जाण्याचे कारण नसून  पोल्ट्री संदर्भात योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना सर्व पोल्ट्री धारकांना देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच