Site icon

नाशिक जिल्ह्यात ‘स्वराज्य’च्या 100 शाखांचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कष्टकरी, कामगार, शेतकरी, गोरगरीब यांच्यावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधाच्या लढा उभा करण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटना आहे. सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना झाली असल्याचे प्रतिपादन स्वराज्य प्रमुख माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी केले. महाराष्ट्रातील गावा-गावांमध्ये स्वराज्य संघटनेची बांधणी करण्यासाठी संभाजीराजे यांनी गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्य हे ब—ीद घेऊन 100 शाखांचे जाळे नाशिक जिल्ह्यात उभे केले असून, उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्रात स्वराज्यचा विस्तार करण्यासाठी युवराज संभाजीराजे हे महाराष्ट्र दौर्‍यावर निघालेले असून, त्यांनी 3 दिवसांत नाशिक जिल्ह्यातील 100 शाखांचे उद्घाटन केले आहे. त्यामध्ये सिन्नर, इगतपुरी, नाशिक शहर, पूर्व भाग व ग्रामीण तालुक्यांमधील शाखांचे उद्घाटन केले आहे. अजूनही पुढील टप्प्यात अनेक ठिकाणी उद्घाटन करणार असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.

हा शाखा विस्तार करण्यासाठी संघटनेचे प्रवक्ते करण गायकर, निमंत्रक गणेश कदम, तुषार जगताप, केशव गोसावी, डॉ. रुपेश नाठे, प्राध्यापक उमेश शिंदे, प्रमोद जाधव, ज्ञानेश्वर थोरात, नवनाथ शिंदे, विजय खर्जुल, आशिष हिरे, पुंडलिक बोडके, दत्ता हराळे, मयूर पांगारकर, सागर पवार, नितीन पाटील, डॉ. रवींद्र पवार, मधुकर शिंदे,योगेश शिंदे,नारायण जाधव, यश बच्छाव, गोकुळ धोंगडे, तुषार भोसले, ज्ञानेश्वर भोसले, वैभव दळवी, सागर पांगरे, रवी धोंगडे, नवनाथ वैराळ या कोअर कमिटी सर्व दौर्‍याची तयारी करत दौरा संपन्न केला. या कार्यक्रमासाठी प्रत्येक गावातील शाखा अध्यक्ष व सदस्य यांनीही काटेकोरपणे नियोजन करून प्रत्येक गावात स्वराज्याचे भगवे वादळ तयार केले. शाखा उद्घाटनासाठी कोअर कमिटी मधील स्वराज्याचे प्रवक्ते धनंजय जाधव, अंकुश कदम, विनोद साबळे, गंगाधर काळकुटे, महादेव देवसरकर, हे प्रमुख अतिथी म्हणून या शाखेच्या कार्यक्रमांना उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात ‘स्वराज्य’च्या 100 शाखांचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Exit mobile version