नाशिक जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत १०१ ने वाढ; दिवसभरात २२३ कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्‍हा एकदा वाढू लागली आहे. सोमवारी (ता.२३) दिवसभरात ३२५ कोरोना बाधित आढळून आले असून, २२३ रूग्‍णांनी कोरोनाने मात केली आहे. एका रूग्‍णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत १०१ ने वाढ झाली आहे. सद्यस्‍थितीत जिल्ह्या‍यात २ हजार ७१२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील २०९ बाधित

सोमवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २०९, नाशिक ग्रामीणमधील ९८, मालेगावचे सात तर जिल्‍हाबाहेरील अकरा कोरोना बाधितांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १४८, नाशिक ग्रामीणमधील ६७, मालेगावचे दोन तर जिल्‍हाबाहेरील सहा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. नाशिक ग्रामीण भागातील देवळाली कॅम्‍प येथील ६९ वर्षीय पुरूष रूग्‍णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून आतापर्यंत आढळलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या ९८ हजार ०५४ झाली असून, यापैकी ९४ हजार ४७६ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ७६६ रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

१ हजार ८१२ अहवाल प्रलंबित

दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ५१४, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ५२, मालेगाव क्षेत्रात दोन, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन तर जिल्‍हा रूग्‍णालयात तीन रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ८१२ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक शहरातील १ हजार ११६, नाशिक ग्रामीणमधील ५२७ तर मालेगाव क्षेत्रातील १६९ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ