Site icon

नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विविध संवर्गातील पदांसाठी शनिवारी (दि. 5) परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील 7 हजार 911 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. नेहमीपेक्षा आजचा पेपर अधिक सोपा गेल्याने परीक्षार्थी उमेदवारांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.

एमपीएससीने गट-क अंतर्गत मंत्रालयीन लिपिक, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक, कर सहायक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक अशा एक हजार 695 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिकमधील 26 केंद्रांमध्ये शनिवारी सकाळी 11 ते 12 यावेळेत परीक्षा घेतली. नाशिक जिल्ह्यातील 10 हजार 539 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानुसार 7 हजार 911 उमेदवारांनी परीक्षा दिली, तर 2 हजार 628 उमेदवारांनी दांडी मारली. दरम्यान, तीन वर्षांतील ही सर्वात मोठी भरती असल्याने मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले होते. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने 900 अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक केली होती. तसेच परीक्षेवेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यात 7,900 उमेदवारांची एमपीएससीला दांडी appeared first on पुढारी.

Exit mobile version