नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांच्या तर्जनीवर ओळख म्हणून निळ्या रंगाची शाई लावली जाते. त्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी निळ्या रंगाच्या शाईच्या १३ हजार ६५ बाटल्या उपलब्ध झाल्या आहेत. यामधील प्रत्येक बाटलीत १० मिली शाई उपलब्ध आहे. (Nashik Lok Sabha Election 2024)
देशभरात १८ व्या लोकसभेसाठीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणुकीचा टप्पा जसजसा पुढे सरकेल तशी प्रचारात रंगत भरली जाणार आहे. राजकीय पक्षांच्या विविधरंगी झेंड्यांमध्ये सर्वाधिक महत्त्व हे मतदानाच्या निळ्या शाईला असते. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांमध्ये नागरिकांच्या बोटावर लावली जाणारी ही शाई म्हणजे भक्कम लोकशाहीचा संदेश देत असते. त्यामुळे या शाईला विशेष असे महत्त्व आहे. नाशिक जिल्ह्यात २० मे राेजी मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. नाशिक, दिंडोरी व धुळे-मालेगाव मतदारसंघांसाठी एकाचवेळी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक शाखेने ४,८०० मतदान केंद्र अंतिम केले आहेत. या मतदान केंद्रांवर मतदान साहित्य, ईव्हीएम-व्हीव्ही पॅटसोबत मतदान शाईच्या कुप्याही वितरित केल्या जाणार आहेत. (Nashik Lok Sabha Election 2024)
जिल्ह्यातील मतदान केंद्रांकरिता निवडणूक शाखेने ९,६०० शाईच्या बाटल्यांची मागणी केली होती. निवडणूक आयाेगाने १३ हजार ६५ बाटल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १० मिलीच्या दोन याप्रमाणे या बाटल्या वितरित केल्या जातील, अशी माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
म्हैसूरवरून पुरवठा (Nashik Lok Sabha Election 2024)
लोकसभा-विधानसभा निवडणुकीत वापरली जाणारी शाई ही वर्षानुवर्षांपासून कर्नाटकातील म्हैसूर येथून येते. मतदान प्रक्रियेत म्हैसूर पेंट आणि वॉर्निशपासून तयार केलेल्या या शाईचा वापर केला जाताे. मतदानावेळी मतदारांच्या तर्जनीवर लावली जाणारी ही शाई पुढील काही दिवस बोटावर कायम असते.
हेही वाचा –
- NIA team attacked in W. Bengal: पं. बंगालमध्ये ED नंतर आता NIA च्या पथकावर हल्ला; २ अधिकारी जखमी
- राणे व सामंत यांचे शक्तिप्रदर्शन; सलोख्याचेही प्रयत्न
- Lok Sabha Election 2024 | अखेर दिंडोरी मतदारसंघाची याचिका मागे, पाच वर्षांनंतर उमेदवाराचे मन वळविण्यात प्रशासनाला यश
The post नाशिक जिल्ह्यासाठी १३ हजार शाईच्या बाॅटल्स appeared first on पुढारी.