नाशिक जिल्ह्यास मिळाले ६ उपअधीक्षक, ४ सहायक पोलिस आयुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य पोलिस दलातील उपअधीक्षक व सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या १३९ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या आहेत. त्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात १० नवीन अधिकारी मिळाले आहेत. शहरात नव्याने चार सहायक आयुक्त आणि ग्रामीणमध्ये सहा उपअधीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

गृहविभागाने केलेल्या बदल्यांनुसार, शहरातील विशेष शाखेच्या दीपाली खन्ना आणि युनिट तीनचे समीर शेख यांची बदली झाली आहे, तर यापूर्वी नाशिक शहरातील भद्रकाली, अंबड पोलिस ठाण्यांची जबाबदारी सांभाळलेले व सध्या ग्रामीणमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांची पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. यासह चंद्रपूर, बृहन्मुंबई आणि चिपळूण येथून नवे अधिकारी नाशिक आयुक्तालयात नियुक्त झाले आहेत.

नाशिकमध्ये बदलून आलेले अधिकारी

निफाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, चंद्रपूरचे आर्थिक गुन्हेचे शेखर देशमुख, बृहन्मुंबईचे नितीन जाधव, चिपळूण उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांची शहरात सहायक पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे, तर पंढरपूरहून विक्रम कदम, कराड उपविभागीय अधिकारी रणजित पाटील यांची मालेगाव छावणी, नागपूरहून नीलेश पालवे यांची निफाड उपविभागीय अधिकारी म्हणून, धुळे ग्रामीणमधील प्रदीप मैराळे यांची महामार्ग सुरक्षा पथक, अहमदनगरहून सुनील भामरे यांची नाशिक ग्रामीणला व नंदुरबारहून संजय सांगळे यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे बदली झाली आहे.

नाशिकमधून बदली झालेले अधिकारी

पोलिस आयुक्तालयातील दीपाली खन्ना यांची मीरा-भाइंदर-वसई-विरार, सोहेल शेख यांची ग्रामीणमधील मनमाड येथे, ग्रामीणमधील अर्जुन भोसले यांची पंढरपूरला, मालेगाव छावणीचे प्रदीप जाधव यांची महाड, रायगड येथे, गुप्तचर प्रशिक्षण संस्थेतील जॉर्ज फर्नांडिस यांची बृहन्मुंबई, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील संजय सावंत यांची रायगड मुख्यालयात, नरसिंग यादव यांची बृहन्मुंबईला, नागरी हक्क सरंक्षणचे किशोर सावंत यांची सिंधुदुर्गला, नितीनकुमार पोंदकुले यांची रायगडमधील माणगडला बदली झाली आहे.

पदभाराची उत्सुकता

नाशिक शहर आयुक्तालयात अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार आहे. नव्याने झालेल्या बदल्यांमुळे शहरास अधिकारी मिळाले आहेत. त्यातील दोन अधिकारी शहरासह जिल्ह्यात सेवा बजावत आहेत, तर इतर अधिकारी परजिल्ह्यातील आहेत. तसेच सद्यस्थितीत असलेले अधिकारी लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे बदली झालेल्या चार सहायक आयुक्तांना कोणत्या विभागाचा पदभार मिळतो, याबाबत उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यास मिळाले ६ उपअधीक्षक, ४ सहायक पोलिस आयुक्त appeared first on पुढारी.