नाशिक : जिव्हाळेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण

मुलीचे अपहरण,

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा

जिव्हाळे (ता. निफाड) येथील अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने ओझर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, 21 एप्रिल रोजी दुपारी 12 च्या सुमारास या मुलीचे अपहरण झाले आहे. या मुलीची उंची ५ फूट ३ इंच असून ती शरीराने सडपातळ, रंग सावळा, चेहरा गोल, केस लांब काळे आहेत. तिच्या अंगात लाल रंगाचा पंजाबी टॉप व काळ्या रंगाची लेगिन्ज पॅन्ट, लाल रंगाचा स्टोल आहे. अकरावीत शिकणारी ही मुलगी कोणाला आढळल्यास त्यांनी तातडीने ओझर पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन हवालदार जे. एम. चौघुले यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिव्हाळेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण appeared first on पुढारी.