नाशिक : जुने सिडको परिसरात धारधार शस्त्राने भोकसून युवकाचा खून

सिडको; पुढारी वृत्तसेवा : जुने सिडकोत पोलीस चौकी पासून २० ते २५ फुटावर वर्दळीच्या ठिकाणी एका युवकावर धारधार शस्त्राने भोकसून खून केल्याची घटना गुरुवारी घडली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार ते सहा जणांनी लेखानगर येथील शॉपिंग सेंटर चौकात तरुणावर वार केले. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आठ दिवसापूर्वी अंबड येथे एका युवकाचा खून झालेला होता. त्यानंतर पुन्हा आज एक खून झाल्याने परिसरात भितीदायक वातावरण झाले आहे.

गुरुवारी (दि. २४) दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संदीप आठवले असे मयताचे नाव आहे. पंधरा दिवसात चार खुन झाल्याने पोलिसाच्या कार्यपद्धतीवर चिन्ह निर्माण झाले आहे. मयताचे नाव संदिप प्रकाश आठवले (वय २३ रा पेलिकन पार्क जवळ सिडको) असे आहे.

या बाबत माहिती अशी की. मयत संदिप हा चुलत भाऊ सनी राजू आठवले बरोबर छत्रपती शिवाजी चौक शॉपींग सेंटर येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पाणीपुरी खाण्यासाठी आले होते याच वेळी सहा जण दोन चुकीवर आले त्यांनी संदिप प्रकाश आठवले याच्यावर धारदार शस्त्राने पोटात तसेच अंगावर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ समवेत अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले . मयत संदिप च्या पश्यात आई वडील बहीण भाऊ परिवार आहे . दरम्यान यातील काही आरोपी ची नावे निष्पन्न झाले आहेत. आरोपीच्या शोधार्थ पोलिस रवाना झाले आहे .

The post नाशिक : जुने सिडको परिसरात धारधार शस्त्राने भोकसून युवकाचा खून appeared first on पुढारी.