सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
जुने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अचानक चौक, साईबाबा मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या परिसरात 10 ते 12 दुचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून या प्रकरणी अंबड पोलिसांनी रात्रीच एकाला ताब्यात घेतले आहे. यात आणखी दोन जणांची नावे समोर आली असून पोलिस पथक त्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे.
जुने सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अचानक चौक, साईबाबा मंदिर मागची बाजू येथे शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास 10 ते 12 दुचाकी गाड्यांची अज्ञात समाज समाजकंटकांकडून तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रकार घडला होता. या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अंबड पोलिसांना घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रमिला कावळे व सहकारी यांनी त्वरीत घटना स्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध वेगाने सुरु केला. यात पोलिसांनी रात्री एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. इतर दोघांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.
हेही वाचा :
- PM मोदी बंगळुरात पोहोचले; जय विज्ञान-जय अनुसंधानचा नारा; इस्रोच्या वैज्ञानिकांना लवकरच भेटणार
- पुणे : कॅन्टोन्मेंट रुग्णालयाच्या फलकावर पुन्हा पटेलांचे नाव!
- स्मारकांच्या उभारणीमध्ये जुन्या-नव्या पद्धतीचा संगम करावा : उपमुख्यमंत्री
The post नाशिक : जुन्या सिडकोत दहा ते बारा वाहनांची तोडफोड ; एक ताब्यात, दोघे फरार appeared first on पुढारी.