नाशिक : जेलरोडला आज श्री शिव गायत्री महायज्ञ सोहळा

जेलरोड महादेव मंदिर www.pudhari.news 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जेलरोड येथील अनुसूया नगरातील खर्जुल मळ्यातील ओम शांती शिव महादेव मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. ९) श्री शिव गायत्री महायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ पासून श्री गणेश पूजन, रुद्र देवता मंडल पूजन, मातृका देवी मंडल पूजन, नवग्रह मंडल पूजन, योगिनी मंडल पूजन, ब्रह्मदेवता मंडल पूजन, क्षेत्रपाल कालभैरव पूजन, अग्निस्थापन हवन यानंतर सायंकाळी ६ वाजता उपस्थित साधू-संतांच्या हस्ते यज्ञाची पूर्णाहूती, मंगल आरती व नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. यज्ञाचे पौरोहित्य श्री श्री 1008 महामंडलेश्व र अजितशास्त्री पिंपळे गुरुजी करतील. यावेळी १० ते २ या वेळेत झेन रामोळे आय हॉस्पिटल यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर व नाशिकरोड येथील डॉ. पाटोळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या वतीने हृदयरोग व मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे. या दोन्ही शिबिरांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उमेश बर्वे यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जेलरोडला आज श्री शिव गायत्री महायज्ञ सोहळा appeared first on पुढारी.