नाशिक : जैविक कचरा टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड, नाशिकरोड विभागाची कारवाई

जैविक कचरा टाकणाऱ्यास दंड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड विभागात जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) इतरत्र टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. विहीतगाव येथे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. पारखे क्लिनिकने हा जैविक कचरा टाकला होता. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने त्यांना दंड आकारला.

मनपा प्रभारी आयुक्त तथा प्रशासक भाग्यश्री बानायत यांच्या आदेशाने घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ. कल्पना कुटे यांच्या सूचनेनुसार कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी इतर कचरा टाकल्यावरही १८० रुपये ते १० हजार रुपयांचा दंड आकारला जातो. डेब्रिज टाकल्यावरही ८०० ते आठ हजार रुपये असा दंड आकारला जातो. घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे प्लास्टिक बंदीबाबतही कडक अंमलबजावणी केली जात आहे. विहीतगाव येथील कारवाईत विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छता निरीक्षक विजय जाधव, सागर बारगळ, तेजस गायकवाड, स्वच्छता मुकादम रणजित हसराज, सुनील वाघ, सुनील सकट, अतुल भावसार आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : जैविक कचरा टाकणाऱ्यास २५ हजारांचा दंड, नाशिकरोड विभागाची कारवाई appeared first on पुढारी.