नाशिक : ज्येष्ठ फादर सुरेश साठे यांचे निधन

ज्येष्ठ धर्मगुरू फादर सुरेश साठे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कॅथलिक धर्मप्रांताचे ज्येष्ठ धर्मगुरू फादर सुरेश साठे (62) यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी (दि. 14) पुणे येथील आशाकिरण उपचार केंद्रात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. 15) राहाता (जि. नगर) येथील सेंट फ्रान्सिस चर्चच्या दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

समाजकार्याची आवड असलेले फादर साठे यांनी जेलरोड येथील मुख्यालयातील नाशिक सोशल सर्व्हिस सेंटरचे संचालकपद काही वर्षे भूषविले होते. हरेगाव (ता. श्रीरामपूर, जि. नगर) येथील संत तेरेसा चर्च येथे सध्या ते प्रमुख धर्मगुरू म्हणून कामकाज पाहात होते. गेल्या तीन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर नाशिक व मुंबई येथील रुग्णालयांत उपचार करण्यात आले. पुणे येथे पुढील उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. फादर साठे यांच्या अंत्यविधीप्रसंगी बिशप लुर्डस डॅनियल, फादर नोलेस्को गोम्स, फादर पिटर डिसूझा, फादर संतान, फादर मायकल वाघमारे यांच्यासह ख्रिस्ती व ख्रिस्तेतर भाविक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : ज्येष्ठ फादर सुरेश साठे यांचे निधन appeared first on पुढारी.