नाशिक : झाडावर आदळून दोघे दुचाकीस्वार ठार, लवाटेनगरला मध्यरात्रीची घटना

Accident

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भरधाव वेगाने जात असताना झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची घटना लवाटेनगर परिसरात घडली. बुधवारी (दि.११) मध्यरात्री हा अपघात घडला असून, त्यात विष्णू जोशी व विशाल मराठे हे दोघे जागीच ठार झाले आहेत, तर हर्षल शिरसाठ हा गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तिघे मित्र एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉल सिग्नलच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने लवाटेनगर रस्त्यावरील एका झाडावर आदळताना ते वाचले. तेथीलच लक्षिका मंगल कार्यालयासमोरील दुसऱ्या झाडाला जात त्यांची दुचाकी आदळली. या भीषण अपघातात दुचाकीच्या पुढच्या भागाचा पूर्णत: चक्काचूर झाला. हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वार विष्णू जोशी (वय १८) आणि विशाल मराठे (वय २०, दोघे रा. अक्कलकुवा, नंदुरबार) यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, हर्षल शिरसाठ (वय २२) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी शिरसाठ याची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याचा जबाब नोंदवता आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्हीद्वारे गंगापूर पोलिस अपघाताचा तपास करीत

हेही वाचा :

The post नाशिक : झाडावर आदळून दोघे दुचाकीस्वार ठार, लवाटेनगरला मध्यरात्रीची घटना appeared first on पुढारी.