नाशिक : ञ्यंबकेश्वर जवळील सापगाव शिवारात अखेर ‘डरकाळी’ जेरबंद

त्र्यंबकेश्वर www.pudhari.news

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

पिंपळदसह आजूबाजूच्या गावात दहशत माजवणारा मादी बिबट्याची डरकाळी सापगाव शिवारात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात जेरबंद झाली आहे.

सोमवार (दि.1) रोजी ञ्यंबकेश्वरपासून सुमारे चार किमी अंतरावर असलेल्या सापगाव जवळील तळेगाव धरणाच्या कॅनालमध्ये अडकलेला बिबट्या वन खात्याच्या पिंज-यात सापडला. सकाळी 10 च्या सुमारास तळेगावच्या धरणाला असलेल्या कॅनालच्या पाईप मध्ये बिवटया असल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी तातडीने तसे वन खात्याला कळवले. दरम्यान, वनखात्याचे ञ्यंबकेश्वर, नाशिक व इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनअधिकारी, कर्मचारी यांसह सर्व तातडीने हजर झाले. पंचक्रोशीतल ग्रामस्थ मोठया संख्येने येण्यास सुरूवात झाल्याने जमावाच्या गोंगाटाने पाईपलाईनमध्ये असलेला बिबटया बिचकल्याने कॅनलमधून बाहेरच येत नव्हता. त्यामुळे वन खात्याच्या कर्मचा-यांनी जवळच असलेला पिंजरा पाईपलाईनच्या जवळ आणला. डार्ट गन व जाळे असे विविध मार्गाने बिबटयाला पकडण्यासाठी सर्व कर्मचारी तयारीत होते. कॅनालच्या दुस-या बाजूने धूर करण्यात आला. त्यामुळे बिबटया अलगद  कॅनलबाहेर आला आणि सरळ पिंज-यात अडकला.

बालकांना ठार करणारा बिबटया हाच का?
वनखात्याच्या हाती लागलेला बिबटया मादी असून वय अंदाजे ३ वर्षे आहे. दरम्यान धुमोडी, वेळुंजे, ब्राह्मणवाडे आणि पिंपळद येथे बालकांना ठार करणारा बिबटया आणि पकडलेला बिबट्या तोच आहे का? हे  शोधण्यासाठी डिएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे समजते.

हेही वाचा:

The post नाशिक : ञ्यंबकेश्वर जवळील सापगाव शिवारात अखेर 'डरकाळी' जेरबंद appeared first on पुढारी.