नाशिक : ट्रान्सफार्मरचा शॉक लागल्याने दोन मांजरांचा मृत्यू

मांजर

नाशिक (सिडको) : वृत्तसेवा

इंदिरानगर येथे ट्रान्सफार्मरचा करंट लागल्याने दोन मांजरांचा भाजून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर यातील तिसरी मांजरही भाजल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

इंदिरानगर येथील श्रद्धागार्डन सोसायटीलगत मनपाच्या मोकळ्या भूखंडावर महावितरण विभागाचा ट्रान्सफार्मर आहे. बुधवारी सकाळी महावितरण विभागाच्या या उघड्या ट्रान्सफार्मर भोवती २ ते ३ मांजर खेळत असताना उघड्या वायर्सला मांजराचा धक्का लागला. यावेळी अचानक शॉर्टसर्किट होऊन यातील २ मांजरांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर महावितरण विभागाला तात्काळ संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जागेवर येत वीजपुरवठा बंद केला, परंतु यातील दोन मांजरांचा जागीच मृत्यू झाला असून, तिसरे मांजर सुदैवाने बचावले आहे. त्यालाही विजेचा झटका लागल्याने तिसऱ्या मांजरावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : ट्रान्सफार्मरचा शॉक लागल्याने दोन मांजरांचा मृत्यू appeared first on पुढारी.