नाशिक : ट्रॅक्टरखाली चिरडून चिमुकली ठार

अपघात www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंगणात खेळत असलेल्या दोनवर्षीय चिमुरडीच्या अंगावरून भरधाव ट्रॅक्टरचे चाक गेल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना माडसांगवी शिवारात घडली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यातील नागदतांडा येथील रहिवासी प्रेमचंद देवीदास जाधव (२८) हे सहकुटुंब ऊस तोडणीसाठी नाशिकला आहेत. त्यांची दोन वर्षांची मुलगी जागृती ही शुक्रवारी (दि. १७) सकाळी खेळत होती. त्यावेळी संशयित भाऊराम लक्ष्मण घुलुम (रा. औरंगाबाद रोड, पवार मळा) याने भरधाव ट्रॅक्टर चालवला. त्यातच ट्रॅक्टरचे पुढील चाक जागृतीच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : ट्रॅक्टरखाली चिरडून चिमुकली ठार appeared first on पुढारी.