नाशिक : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, वडिलांविरोधात गुन्हा

चिमुकल्याचा मृत्यू,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ट्रॅक्टरवरून खाली पडून चाकाखाली सापडलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना ध्रुवनगर परिसरात घडली. राघव दिनकर शिंदे असे या चिमुकल्याचे नाव असून रविवारी (दि.३) दुपारी १२.३० वाजता हा अपघात घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात राघवचे वडिल दिनकर विश्वनाथ शिंदे (३८, रा. ध्रुवनगर) यांच्याविरोधात हयगयीने मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनकर शिंदे हे पाण्याचा टँकर जोडून ट्रॅक्टर चालवत होते. त्यावेळी ट्रॅक्टरच्या डाव्या बाजूला राघव बसलेला होता. दिनकर शिंदे यांनी हयगयीने ट्रॅक्टर चालवला. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेला राघवचा तोल गेला व तो खाली पडला. त्यात ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने राघवचा मृत्यू झाला. यामुळे भैरवनाथ शिंदे यांच्या फिर्यादीनुसार दिनकर शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, वडिलांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.