नाशिक : ठाकरे गटाच्या फेसबुकपेजवर पोस्ट केला अश्लिल व्हिडीओ

ठाकरे गट शिवसेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या फेसबूक पेजवर अश्लिल व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी संबंधित समाजकंटकाचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी वजा तक्रार महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलिसांकडे केली आहे.

पक्षाची बदनामी करण्याच्या उद्देशाने कोणीतरी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या फेसबूक अकाऊंटवर ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अश्लिल व्हिडोओ पोस्ट केला आहे. याबाबतची माहिती कळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सायबर पोलिसात धाव घेऊन संबंधित नराधमाचा त्वरित बंदोबस्त करावा. त्यास अटक करून चौकशी करत पक्षाची होणारी बदनामी थांबवावी, अशी मागणी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी महापौर विनायक पांडे, मध्य विधानसभा संघटक बाळा कोकणे, संदीप कानडे आदींनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ठाकरे गटाच्या फेसबुकपेजवर पोस्ट केला अश्लिल व्हिडीओ appeared first on पुढारी.