नाशिक : डॉक्टरांच्या घरात चार लाखांची चोरी

चोरी

नाशिक, कनाशी : पुढारी वृत्तसेवा
कळवण तालुक्यातील कनाशी येथील डॉ. विठ्ठल किसन बहिरम यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि दागिने असा चार लाख 74 हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

कनाशी-पिंपळा रोडवर सप्तशृंगी हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. दवाखान्यातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर व दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर असलेल्या घराच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडले. दोन कपाटांतील रोख रक्कम व दागिने असा चार लाख 74 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सोमवारी कोणीही घरात राहात नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : डॉक्टरांच्या घरात चार लाखांची चोरी appeared first on पुढारी.