नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून

Man murdered his wife and two children in varvand daund pune

मालेगाव मध्य: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील डोंगराळे येथे भावकीच्या वादातून खून झाल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर जनार्धन ह्याळीज (वय ३८ रा. डोंगराळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघा संशयितास अटक करण्यात आली आहे. Nashik Murder Case

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर यांचा मृतदेह डोंगराळे शिवारात मालेगाव कुसुंबा रस्त्यावरील जंगलात फेकून दिल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर हा खून ज्ञानेश्वर यांचे सख्खे चुलत भाऊ भाऊसाहेब वसंत ह्याळीज (वय ३५ रा. डोंगराळे) व रिंगनाथ ह्याळीज (वय ३६ रा. डोंगराळे) यांनी भावकीच्या वादातून केल्याचे स्पष्ट झाले. दोघांना अटक करण्यात आली आहे. Nashik Murder Case

हेही वाचा 

The post नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून appeared first on पुढारी.