
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पुण्यानंतर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकनगरीला ड्रग्जमाफियांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना संरक्षण देणाऱ्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी शुक्रवारी (दि. २०) शिवसेना ठाकरे गटातर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. यात नाशिककरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना उपनेते बबन घोलप यांनी केले आहे.
मोर्चाची रूपरेषा आखण्यासाठी शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये आयोजित पदाधिकारी आणि मान्यवरांच्या बैठकीत घोलप बोलत होते. व्यासपीठावर उपनेते अद्वय हिरे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, गणेश धात्रक, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी गटनेते विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हाप्रमुख कृणाल दराडे, माजी आमदार योगेश घोलप, डी. जी. सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख निवृती जाधव, जगन आगळे, लालचंद सोनवणे, देवानंद बिरारी, महेश बडवे, दीपक खुळे, युवासेना जिल्हाधिकारी बाळकृष्ण शिरसाठ, विक्रम रंधवे, उत्तम खांडबाहाले, गजेंद्र चव्हाण, नितीन चिडे, देवा जधव, संजय चव्हाण, सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी, मसूद जिलानी, संतोष गायकवाड, मंदा दातीर आदी उपस्थित होते.
‘नाशिकनगरी ड्रग्जमुक्त करू या, तरुण पिढी वाचवू या’ ही टॅगलाइन घेऊन हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिंदे गावात ड्रग्जनिर्मितीचा कारखाना चालवला जात होता, ही बाब मुंबई पोलिसांनी उघडकीस आणली. नाशिक पोलिसांना मात्र याची भणकही नव्हती. त्यामुळे कोणाच्या आशीर्वादाने ड्रग्जचा हा कारभार चालत होता, असा प्रश्न डॉ. हिरे यांनी उपस्थित केला. ड्रग्जमाफियांना प्रोत्साहन देऊन युवा पिढीला बरबाद करण्याचे काम करणारे मग ती कितीही मोठी व्यक्ती असली, तरी नाशिककर त्यांना कधीच माफ करणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख दिंडे आणि सहसंपर्कप्रमुख गायकवाड यांनी दिला. नाशिक पोलिस आयुक्तालयाने अमली पदार्थविरोधी पथक तयार केलेले असतानाही त्यांना ड्रग्जच्या या अड्ड्याची माहिती कशी मिळाली नाही, असा सवाल करीत आयुक्त आणि अधीक्षक यांना निलंबित करावे, अशी मागणी करंजकर, आहेर, धात्रक यांनी केली. शिवसेना स्टाइलने समाचार घेणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.
हेही वाचा :
- परवानगीशिवाय फोन रेकॉर्डिंग हे खासगीपणाचे उल्लंघन; छत्तीसगड हायकोर्टाचा निकाल
- Lalit Patil Drug Case : ललित पळाला की पळवला याचे गुढ कायम
The post नाशिक ड्रग्जमुक्तीसाठी ठाकरे गटातर्फे शुक्रवारी आक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.