नाशिक : ‘ड्राय डे’च्या दिवशी मद्यविक्री भोवली, दहा जणांवर कारवाई

'ड्राय डे'च्या दिवशी मद्यविक्री भोवली, दहा जणांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात अवैधरीत्या मद्यसाठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (दि.१५) ‘ड्राय डे’ असल्याने अवैधरीत्या काही जणांनी मद्यविक्री केली. त्यामुळे शहर पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई केली.

आडगाव पोलिसांनी विडीकामगार नगर परिसरातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीजवळ अकरा हजार आठशे रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी ६० वर्षीय वृद्धेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर गंगापूर पोलिसांनी आनंदवल्ली गावातील जोशी वाडा परिसरात साडेपाच हजारांची विदेशी दारू बाळगणाऱ्या विकी सीताराम धुमाळ (३१, रा. आनंदवली) याच्यावर कारवाई केली. तसेच सातपूर पोलिसांनी स्वारबाबा नगरातून ६,११० रुपयांची देशी दारू बाळगणाऱ्या प्रवीण बाबूराव जगताप (४०), अजिंक्य मिलिंद दिवे (२६) आणि योगेश मुरलीधर शिंदे (४५, रा. सातपूर) यांच्यावर कारवाई केली. तर, इंदिरानगर पोलिसांनी राणेनगर बसस्टॉपज‌वळील भिंतीजवळ अडीच हजारांची देशी दारू बागळल्याप्रकरणी ५६ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंबड पोलिसांनी सतराशे रुपयांची देशी दारू बागळणाऱ्या किशोर सुनील रक्षे (२८, रा. मोरवाडी गाव) याच्यावर हॉटेल शिवसागरमध्ये कारवाई केली. तर, म्हसरूळ पोलिसांनी मखमलाबाद गाव बसस्टँडसमोर एक हजार रुपयांची देशी दारू बाळगणाऱ्या संतोष निवत्ती निंबेकर (२९, रा. दिंडोरी रोड) याच्यावर कारवाई केली.

हेही वाचा :

The post नाशिक : 'ड्राय डे'च्या दिवशी मद्यविक्री भोवली, दहा जणांवर कारवाई appeared first on पुढारी.