नाशिक : ढोल बजाव मोहीमेअंतर्गत ९१ लाख वसूल

कर वसूली पथक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या विविध कर वसुली विभागामार्फत सुरू असलेल्या ढोल बजाव मोहिमेअंतर्गत तिसऱ्या दिवशी ९१ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण पावणेतीन कोटींची घरपट्टीचा कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

मनपाने १२५८ इतक्या बड्या थकबाकीदारांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावूनही कर अदा केला जात नसल्याने कर विभागाने गेल्या सोमवारपासून ढोल बजाव मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी ९१ लाख सहा ३८० रुपये कर वसूल झाला आहे. पश्चिम विभागात सर्वाधिक २७ लाख २८ हजार कर वसुली झाली असून, त्याखालोखाल पंचवटी विभागात १४ लाख १८ हजार ७४५ रुपये कर वसुली झाली. सहा विभागात एकूण १०९ ठिकाणी ढोल वाजविण्यात आले. तीन दिवसात एकूण दोन कोटी ७४ लाख रूपयांचा कर वसूल झाला आहे. सुट्टीचे दिवस वगळता १९ दिवस वसुलीची मोहीम सुरू राहणार आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी भरावी तसेच चालू वर्षाचा कर भरून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर विभागाने केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ढोल बजाव मोहीमेअंतर्गत ९१ लाख वसूल appeared first on पुढारी.