नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट

नाशिक (पिंपरखेड) :  पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील विविध ठिकाणी मक्यावरील तणनाशकाचा विपरीत परिणाम होऊन मका पिकाचे नुकसान होऊन बळीराजा हतबल झाला आहे. देशातील अग्रगण्य कंपनीच्या टिंझर या मक्यावरील तणनाशक औषधाने पाच शेतकर्‍यांच्या शेतातील पिकावर शंभर टक्के दुष्परिणाम होऊन मका पीक करपून गेले. कंपनीने आपल्या तणनाशक औषधाचा लॉट बाजारातून काढून घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे.

नांदगाव तालुक्याततील पिंपरखेड येथील शेतकरी संदीप गरुड व शांताराम घोटेकर यांनी मका पिकावर टिंझर हे सिलेक्टिव्ह तणनाशक फवारणी केल्याने मका पीक करपून पिवळे व सफेद पडले. हे तणनाशक शेतकर्‍यांनी न्यायडोंगरी येथील दुकानांतून खरेदी केले होते. या औषधांचा लॉट क्र. डीटीझेड-21014 असून, फवारणी केल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून मका पिके करपू लागली. त्याचप्रमाणे नागापूर(ता. नांदगाव) येथे धर्मा पवार व सुभाष बोडके यांच्या शेतातील मका पिकावर एका कंपनीचे (टोप्रमिझोन) टिंझर हे तणनाशक फवारणी केल्यामुळे मका पीक करपले. हे तणनाशक शेतकर्‍यांनी मनमाडच्या एका दुकानातून खरेदी केले होते.

गरुड व घोटेकर यांनी कृषी विभागाशी याबाबत संपर्क साधत झालेल्या नुकसानीची माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, वडेलच्या कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ रूपेश खेडकर, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील व पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश चौधरी यांच्या उपस्थितीत कंपनीचे प्रतिनिधी बाहेकर व कृषी सेवा केंद्राचे सचिन पाटील यांच्या उपस्थितीत मका पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. पीक 100 टक्के करपल्याचे निदर्शनास आल्याने तसा अहवाल शेतकर्‍यांना देण्यात आला. शेतकर्‍यांचे पिकाचे पूर्ण नुकसान झाल्याने कंपनीने पूर्ण नुकसान भरून द्यावे, अशी मागणी पिंपरखेड विकासोचे संचालक धनंजय देशमुख व उपस्थित शेतकर्‍यांनी कंपनी प्रतिनिधींकडे केली.

विविध ठिकाणांहून तक्रारी प्राप्त झाल्याने लॉट क्र. डीटीझेड -21014 हा या औषधाचा साठा तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवला असून, हे तणनाशक फवारणीसाठी वापरू नये.
– दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव

दुष्काळ, अतिवृष्टीच्या संकटाबरोबर बनावट औषधांची भर पडली असून, कंपनीने शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.
– धनंजय देशमुख, संचालक पिंपरखेड विकासो

प्रयोगशाळेत होणार तपासणी

कंपनीचे लॉट नंबर डीटीझेड- 21014 या लॉटचे टोप्रामिझोन (टिंझर) या तनणाशकाच्या फवारणी केलेल्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील संदीप गरुड, पिंपरखेडचे शांताराम घोटेकर, तांदूळवाडी येथील समाधान काकळीज व नागापूर येथील धर्मा सोमासे आणि सुभाष बोडके या गावातील पाच शेतकर्‍यांकडे मका पीक करपल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या लॉटचे तणनाशक तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहे. हे तणनाशक बाजारातून परत घेण्यात आले असून, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा :

The post नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट appeared first on पुढारी.