नाशिक : तनिशा कोटेचाची भारतीय संघात निवड

तनिषा कोटेचा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ईटानगर, हिमाचल प्रदेश येथे दि. १४ ते १७ मे २०२३ या कालावधीत होणाऱ्या साउथ एशियन यूथ टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १९ वर्षांखालील मुलींच्या भारतीय संघात तनिशा कोटेचाची निवड झाली आहे. स्पर्धेत भारताबरोबर बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. तनिशाला सध्या १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे दुसरे व चौथे मानांकन असून, जागतिक स्तरावर तिला १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या गटात अनुक्रमे 18 वे व 36 वे मानांकन आहे. तर टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने नाशिकचे टेबल टेनिस प्रशिक्षक जय मोडक यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे. तनिशा ही मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. त्या दोघांचा सत्कार आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, अभिषेक छाजेड आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : तनिशा कोटेचाची भारतीय संघात निवड appeared first on पुढारी.