नाशिक : तनिष्क शोरुममधून महिलेने चोरल्या साडेतीन तोळ्यांच्या दोन बांगड्या

दागिने चोरी,www.pudhari.news

नाशिक : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलेने साडेतीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपूर्व लक्ष्मण दराडे (30, रा. पंडित कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी संशयित अंजू चोपडा (37) ही महिला शरणपूर रोडवरील तनिष्क शोरूम येथे बांगड्या बघत होती. बांगड्या पसंत पडल्या नाहीत, असे कारण सांगून अंजू दुकानातून निघून गेल्या. रात्री दुकानातील सोन्याच्या दागिन्यांची तपासणी करत असताना त्यात 36.209 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या नसल्याचे आढळले.

हेही वाचा :

The post नाशिक : तनिष्क शोरुममधून महिलेने चोरल्या साडेतीन तोळ्यांच्या दोन बांगड्या appeared first on पुढारी.