नाशिक : तपोवनात १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

मध्यरात्री काही समाजकंटकांनी तपोवन रोड येथील सर्विस रोडवरील गॅरेज मधील १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असुन याविषयी येथील सर्व गॅरेजधारकांच्या वतीने आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे. गॅरेजमालकांकडून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजद्वारे लवकरात लवकर आरोपी शोधण्याची मागणी केली आहे.

मध्यरात्री (दि १५) एक ते दिड वाजेच्या दरम्यान सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असुन वॉचमनला देखील मारझोड करण्यात आली आहे. सीसीटीव्ही मध्ये प्राप्त झालेल्या दृश्यानुसार धाक निर्माण करण्याचा दृष्टीने हा प्रकार झाल्याचे आढळून येत आहे. यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलर ट्रक व इतर पाच लहान चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भयाचे वातावरण निर्माण झाले असून आडगाव व पंचवटी परिसरात सध्या गुंडांनी दहशत निर्माण केली आहेत पोलिसांनी अशा समाजकंटकांना वेळीच आवरण्याची गरज आहे. पंचवटी, आडगाव परिसरात पेट्रोलिंग होत नसल्याने असे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : तपोवनात १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.