Site icon

नाशिक : …तर महिला पथकाला चोप देणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जर महिला पथकांचा वापर केला आणि त्या महिलांनी शेतकऱ्यांना वसुलीसाठी अपमानित केले तर आमच्याही शेतकऱ्यांच्या महिला त्या महिलांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व त्यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक चव्हाण व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत कड, शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे, शंकर फुगट यांची २ तास बैठक जिल्हा बँकेच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात सध्या महिला पथकाकडून वसुलीसाठी शेतकऱ्यांना अपमानित करण्याचे काम सुरू आहे. आज पर्यंत सहन केले इथून पुढे जर महिला पथकाने शेतकऱ्यांना अपमानित केले तर शेतकऱ्यांच्या घरातील महिला त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही. असे स्पष्टपणे प्रशासक चव्हाण याना कृती समितीने सांगितले. तसेच नवीन ओटीएस योजना दिल्याशिवाय बँक वाचणार नाही. यासाठी कृती समिती शासन स्तरावर प्रयत्न करते आहे. जिल्हा बँकने देखील केलेल्या प्रयत्नाचा चव्हाण यांनी लेखाजोखा मांडला.

बँक वाचवण्यासाठी चांगले मार्ग बँक शोधत असल्यास त्यास कृती समिती निश्चित साथ देईल परंतु वसुली पथकाने गरीब शेतकऱ्यांवर दादागिरी केल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ. असा इशारा देखील कृती समितीने प्रशासकांना दिला व लवकर नवीन ओटीएस योजना देण्याचा आग्रह धरला. तसेच या दरम्यान दूरध्वनी वरून राजु शेट्टी यांनी देखील प्रशासक चव्हाण यांच्याशी चर्चा केली. व राज्य बँके कडून कमी व्याजाने दीर्घकालीन कर्ज घेऊन शेतकऱ्यांना ओटीएस देण्याची चव्हाण याना सूचना केली.

हेही वाचा :

The post नाशिक : ...तर महिला पथकाला चोप देणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा appeared first on पुढारी.

Exit mobile version