नाशिक : तारेच्या कुंपणात अडकला, बिबट्या दोन तास वेदना सहन करत राहिला; अखेर वनविभागने घेतली धाव

तारेच्या कुंपणात अडकला बिबट्या,www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
मौजे मोहाडी व साकोरे मिग शिवारातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या संरक्षक भिंतीच्या भगदाडात तारेच्या कुंपणामध्ये अडकलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. दोन तासांपासून जखमेमुळे वेदना सहन करणार्‍या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

मंगळवारी (दि.23) सकाळी साडेसातच्या सुमारास ओझरच्या साकोरे मिग जवळील एचएएल कंपनीच्या रडार क्रमांक 3 लगतच्या संरक्षक भिंतीच्या भगदाडातील कुंपणात सावजाच्या शोधात आलेला आठ महिन्याचा बिबट्या अडकला. कुंपणाच्या तारा बिबट्याच्या दोन्ही बाजूने गळ्यात घुसल्याने त्याने डरकाळी फोडत आक्रोश केला. मात्र, रक्तस्त्राव अधिक झाल्याने जखमी बिबट्या विव्हळत पडला. अखेर अकराच्या सुमारास वनविभागाला माहिती कळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा :

The post नाशिक : तारेच्या कुंपणात अडकला, बिबट्या दोन तास वेदना सहन करत राहिला; अखेर वनविभागने घेतली धाव appeared first on पुढारी.