Site icon

नाशिक : तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मांडवडच्या मुलींच्या संघाने मारली बाजी

नांदगाव: पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, संचलित स्व.शरद  अण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड शाळेत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय नांदगाव तसेच स्व.शरद अण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी गट विकास अधिकारी गणेश चौधरी, नांदगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. ईश्वर पाटील, मांडवड गावचे ज्येष्ठ नेते विठ्ठल आहेर, शिवबा ग्रुपचे संस्थापक अशोक निकम, संस्थेचे सभासद प्रशांत आहेर, रामराव मोहिते, प्रकाश आहेर, वाल्मिक थेटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तालुक्यातील कबड्डी स्पर्धेमध्ये १४, १७, १९ वयोगटातील विद्यार्थांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेले गट विकासअधिकारी गणेश चौधरी यांनी उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्ती जोपासण्याचे आव्हान केले. मुख्याध्यापिका एस. एस. कांबळे  यांनी प्रास्ताविक केले. नांदगाव तालुका म.वि.प्र.संचालक अमित बोरसे पाटील यांनी क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा देत आयोजनाबद्दल मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षक संदीप आहेर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. तर स्पर्धेतील १४ वर्षे आतील मुलांच्या स्पर्धेमध्ये व्ही. एन. नाईक हायस्कूल वेहेळगाव संघ प्रथम क्रमांक तर सेंट झेवियर हायस्कूल मनमाडच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. १७ वर्ष आतील वयोगटात मुलांच्या कबड्डी स्पर्धेत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगाव संघाने प्रथम क्रमांक तर छत्रे हायस्कूल मनमाडच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. १९ वर्षीय मुलांच्या स्पर्धेमध्ये महात्मा गांधी जुनियर कॉलेज मनमाडच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला तर जनता विद्यालय भालूर या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. दुसऱ्या दिवशी झालेल्या तालुकास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटांमध्ये जनता विद्यालय जातेगाव प्रथम क्रमांक तर क.मा.का.विद्यालय नांदगाव द्वितीय क्रमांक मिळविला. १७ वर्षे वयोगटांमध्ये प्रथम क्रमांक स्व. शरद अण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड तर द्वितीय क्रमांक व्ही. जे.हायस्कूल नांदगाव संघाने मिळविला. १९ वर्षातील मुलींच्या अंतिम सामन्यांमध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नांदगावच्या संघाने प्रथम क्रमांक तर महात्मा गांधी जुनिअर कॉलेज मनमाडच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. तिन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र तिन्ही संघांना शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा:

The post नाशिक : तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मांडवडच्या मुलींच्या संघाने मारली बाजी appeared first on पुढारी.

Exit mobile version