
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक तालुका शेतकी संघाची २०२३ ते २०२८ पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या आपल्या पॅनलच्या एकहाती विजयाने मावळली. १७ पैकी तब्बल १३ जागांवर विजयश्री मिळवत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आपलाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले. रविवारी (दि.१७) मतदान होऊन मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी राजीव इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
नाशिक तालुका शेतकी संघाच्या १७ जागांसाठी ८५ अर्ज दाखल झाले होते. मात्र इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे ही निवडणूक दोन पॅनलमध्ये झाली. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतकी संघात वर्चस्व मिळाले होते. मात्र यंदा बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांनी बाजी मारत चुंभळेंच्या सत्तेला सुरुंग लावला. यामध्ये आमदार राहूल ढिकले, माजी जि. प. सदस्य संजय तुंगार, गोकुळ काकड, विश्वास नागरे, संपतराव सकाळे, शंकर पिंगळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
निवडणुकीत देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनल तर शिवाजी चुंभळे, मुरलीधर पाटील, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, बाजार समितीचे संचालक राजाराम धनवटे आदींच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलची घोषणा केली होती.
वैयक्तिक सभासद सर्वसाधारण प्रतिनिधी
दिपक हगवणे 1752 (आपलं पॅनल)
विष्णू थेटे 1677 (आपलं पॅनल)
शांताराम माळोदे 1626 (आपलं पॅनल)
भिकाजी कांडेकर 1557 (आपलं पॅनल)
सहकारी संस्था सभासद प्रतिनिधी
शरद गायखे 56 (आपलं पॅनल)
रावसाहेब कोशिरे 48 (आपलं पॅनल)
बबन कांगणे 48 (आपलं पॅनल)
दिलीप चव्हाण 44 (आपलं पॅनल)
दिलीप थेटे 42 (आपलं पॅनल)
वामनराव चुंभळे 48 (शेतकरी विकास पॅनल)
संजय चव्हाण 44 (शेतकरी विकास पॅनल)
नवनाथ कोठुळे 46 (शेतकरी विकास पॅनल)
विमुक्त जाती भटक्या जमाती
वाळू काकड 1699 (आपलं पॅनल)
इतर मागास सदस्य प्रतिनिधी
जयराम ढिकले 1879 (आपलं पॅनल)
महिला प्रतिनिधी
मीरा लभडे 1674 (शेतकरी विकास पॅनल)
आशा गायकर 1668 (आपलं पॅनल)
अनुसूचित जाती-जमाती
ढवळू फसाळे 1736 (आपलं पॅनल)
निवडणूक ही फक्त पैसा, जबरदस्ती यावर होत नसते. जनता आपल्या सोबत आहे. लोकांना हुकुमशाही चालत नाही. जनता जनार्दनाला सर्व समजते. त्यांनी निवडणूक हातात घेतली की योग्य व्यक्तींना न्याय मिळतो. – देविदास पिंगळे, सभापती, बाजार समिती,
The post नाशिक : तालुका शेतकी संघ निवडणुकीत पिंगळेंचा वरचष्मा, appeared first on पुढारी.