नाशिक तालुक्यात प्रस्थापिताविरोधात नवोदितांना कौल; ‘या’ गावात सत्ता परिवर्तन

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकांत सोमवारी (ता. 18) प्रस्थापितांना धोबीपछाड देत युवकांनी गावाच्या राजकारणात बाजी मारली. तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीत मतमोजणी होउन त्यात, तालुक्यातीव पूर्व पट्यातील महत्वाच्या शिंदे, पळसे, जाखोरी, पिंप्रीसैय्यद, माडसांगवी, ओढा, शिलापूरसह अनेक प्रमुख गावात प्रस्थापितांचे पॅनल पराभूत झाले. तरुण कार्यकर्त्यांना गावोगावच्या ग्रामस्थांनी संधी दिली. 

25 वर्षापासूनचे नेत्यांचे पॅनल पराभूत

नाशिक तालुक्यात आतापर्यंतच्या ग्रामीण राजकारणात शिवसेनेचा प्रभाव राहिला आहे. शिवसेनेचा उदय होत असतांना बहुतांश गावात शिवसेनेच्या पदाधिकाऱयांचा सत्ताकारणातउदय होत होता. त्यातून ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील अनेकगटावर शिवसेनेने प्रभाव राखला होता. आजच्या निवडणूकीत शिवसेनेचे तालुक्यातून पुढे आलेले 20 ते 25 वर्षापासूनचे नेत्यांचे पॅनल पराभूत झाले आहे. 

दोन दशकानंतर परिवर्तन 

तालुक्यातील पूर्व पट्यातील पुणे महामार्गारील शिंदे, पळसे, पिंप्री सैय्यद, जाखाेरी, औरंगाबाद मार्गावरील माडसांगवी, शिलापूर, ओढा या बागायतदारांचा प्रभाव असलेल्या गावात सगळीकडेसत्ताधारी गटांना निवडणूकीत ग्रामस्थांनी हादरा दिला. 

महत्वाच्या गावाचा कौल 

पुणे मार्गावरील पळसे गावात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख जग आगळे यांची सुमारे 25 वर्षापासूनची सत्ता संपृष्ठात आली. परपरांगत विरोधकांशी पॅनल करणे त्यांना भोवले. शिंदे गावात जि.प. माजी सदस्य संजय तुंगार व त्यांच्या भावजयी सरपंच जयश्री तुंगार यांची 25 वर्षाची सत्ता होती. आज तेथे त्यांचे पारंपारीक विरोधक व काॅग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रतन जाधव यांच्या पॅनलच्या नव्या उमेदवारांना कौल मिळाला. जाखोरीत ग्रामस्थांनी प्रस्थापित पॅनलला सत्तेपासून दूर ठेवले. औरंगाबाद मार्गावरील शिलापूर,ओढा, माडसांगवी गावात वेगळे चित्र नव्हते.

सभापती अनिल ढिकले यांच्या बंधूच्या पॅनलचा पराभव

सत्ताधारीपॅनलचा धुव्वा उडाला नसला तरी, सत्तेपासून मात्र लोकांनी दूर ठेवले. लाखलगावला निवृत्ती कांडेकर यांच्या पॅनलला पराभव झाला. शिलापूरला मधुकर कहांडळ तर माडसांगवी येथे शिवसेनेचे तुकाराम पेखळे यांच्या पॅनलला सत्तेपासून दूर राखले. सत्ताधारी पॅनलला काहीजागा मिळाल्या पण सत्तेने मात्र पाठ फिरविली. पिंप्री सैय्यद हे माजी खासदार दिवगंत अॅड उत्तमराव ढिकले यांचे गाव तेथे सभापती अनिल ढिकले यांच्या बंधूच्या पॅनललापराभव झाला. तालुक्यातील 22 पैकी महत्वाच्या सात गावात जे चित्र होते तसेच काहीसे चित्र इतर लहान लहान गावात राहिले.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

पक्षीय अस्मिता बाजूला 

गाव पातळीवर पक्षाच्या नावावर निवडणूका होत नाही. त्यात यावेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस आणि काॅग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार असल्याने महत्वाचे नेते आमदार, खासदार ग्रामपंचायतीच्या निवडणूकांपासून दूरच राहिले. त्यांचे कार्यकर्ते मात्र सोयीनुसार सक्रिय होते. त्यात, प्रस्थापित पॅनलमध्ये संधी न मिळाल्याने अनेक तरुण कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला डोळ्यासमोर ठेउन पक्षीय नेत्याऐवजी सोयीच्या आघाडीतील विरोधकांशी जुळवून घेत, प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. त्यात त्यांना यश आले.  

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश